shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील सर्व बँका,पतसंस्था व फायनान्स कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे -श्रीयश नलवडे

इंदापूर तालुक्यातील सर्व बँका,पतसंस्था व फायनान्स कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे -श्रीयश नलवडे.


इंदापूर प्रतिनिधी: संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनंतर बँक कर्मचारी यांना कोरोना योद्धा चा दर्जा देण्यात आला आहे हा निर्णय जरी उशिरा घेण्यात आला असला तरी स्वागतार्ह आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने अत्यावश्यक सेवा म्हणून राष्ट्रीयकृत आणि सहकारी बॅक,पतसंस्था कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे आणि आजही ते आपली सेवा बजवात आहेत. त्यामुळे त्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी विद्यानंद सहकारी बँकेचे अधिकारी श्रीयश नलवडे यांनी इंदापूर तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

सद्यपरिस्थितीत बँक कर्मचारी हे कोरोना चे भीषण संकट असतानाही विनाखंडित आपली सेवा समाजाला पुरवीत आहेत हे शासनाने लक्षात घ्यावे. खर सांगायचं झालं तर बँक,पतसंस्था ,फायनान्स कंपन्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांकडून व ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून कोरोना संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. 

देशात गतवर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने सर्व व्यवस्था कोलमडून पडली असताना आणि सगळीकडे लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाली होती त्यामध्ये आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण विभाग यांच्या बरोबरीने सर्वच राष्ट्रीयकत आणि सहकारी क्षेत्रातील बॅक,फायनान्स कंपनी,पतसंस्था कर्मचार्‍यांनी सुद्धा अत्यावश्यक सुविधा म्हणून आपली सेवा त्याच ताकदीने बजावली होती आणि आजही ते आपली सेवा बजावत आहेत त्यामुळे बँक कर्मचार्‍यांना कोरोना योद्धा म्हणून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी श्रीयश नलवडे यांनी इंदापूर तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

जर या निवेदनाचा शासनाने सकारात्मक विचार केला तर लसीकरणाच्या तुटवड्याचा फटका या सर्व कर्मचाऱ्यांना बसणार नाही यातूनच बँक,पतसंस्था,फायनान्स कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे श्रीयश नलवडे यांनी सांगितले.
close