shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मधील शिक्षक कॉलनीत घरफोडी : टीव्ही व सायकलची चोरी..!!

 
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
केज येथील बीड रोड लगतच्या शिक्षक काॅलनीत एकाचे घर फोडून घरातील  टीव्ही व सायकल लंपास केल्याची घटना घडली आहे. 


या बाबतची माहिती अशी की, केज येथील बीड रोड लगतच्या शिक्षक कॉलनीत राहात असलेले गोविंद दिनकर घोळवे हे २१ एप्रिल ते ६ मे दरम्यान केज येथील घराला कुलूप लावून त्यांच्या मूळ गावी सारणी (सांगवी) येथे आई-वडिलांच्याकडे गेले होते. त्यानंतर ते ६ मे रोजी केज येथील त्यांच्या घरी आले असता; त्यांच्या घराची अज्ञात व्यक्तीने घरफोडी करून आतील एम आय कंपनीची १२ हजार रु. किंमतीची टी. व्ही. व जुनी सायकल असा १३ हजार रु. च्या मुद्देमालाची चोरी झाली आहे.

या प्रकरणी गोविंद दिनकर घोळवे यांनी केज पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून त्या नुसार पोलीस ठाण्यात गु.र.नं.२२७/२०२१ भा.दं.वि. ४५७ व ३८० नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी मंगेश भोले हे पुढील तपास करीत आहेत.
close