राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण प्रचंड वाढत असताना पोयनाड कुर्डुस विभागात रुग्णसंख्या अद्यापही नियंत्रणात आहे. आता या विभागातील नागरिकांना ऑक्सिजन कॉन्सेन्टेटर अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात आत्मविश्वास आणखी वाढणार असल्याने येथील नागरिकांनी आ. महेंद्र दळवी यांचे आभार व्यक्त केले.
पोयनाड विभागातील चिखली आरोग्य केंद्राला आज गुरुवार दिनांक २७/५/२०२१ रोजी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील युवा सेनेचे कुर्डूस विभाग प्रमुख अभिषेक पाटील कुसुंबळे चे उप सरपंच सौ.रसीका केणी सदस्य उत्तम शेठ पाटील सदस्य अर्चना पाटील सदस्य जागृती पाटील युवा सेनेचे उप विभाग प्रमुख संकेत पाटील आणि शिवसेनैनिक यांनी चिखली आरोग्य केंद्रात जाऊन ऑक्सिजन कॉन्सेन्टेटर भेट देण्यात आली आ. महेंद्र शेठ दळवी यांनी स्व खर्चातुन देण्यात आले ऑक्सिजन काॅन्सेन्टेटर भेट देण्यात आले.
यावेळी बोलताना राजा केणी यांनी सागितले की, पोयनाड- कुर्डुस विभागात शिवसेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे मागील अनेकवर्ष रखडलेली विकासकामे मार्गी लागत आहेत. पाणी, रस्ते या सुविधांबरोबर पुरवण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक सुविधांमुळे येथील नागरिक कोरोनावर यशस्वी मात करतील, असा विश्वासही राजा केणी यांनी व्यक्त केला. पोयनाड- कुर्डुस विभागात अद्यापही कोरोना रुग्णसंख्या इतर विभागाच्या प्रमाणात कमी आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जावून गावे निर्जंतूकिकरण करून कोरोना विषयक जनजागृती केलेली आहे. कोरोना नियंत्रणाची त्रिसुत्री, प्राथमिक उपचार यांची माहिती देण्यात आली होती. यास नागरिकांचे सहकार्य चांगल्या प्रकारे मिळत आहे. याबरोबरच आ. महेंद्र दळवी यांच्याकडून मिळालेल्या ऑक्सिजन कॉन्सेन्टेटरमुळे येथील नागरिकांमध्ये कोरोना विरुद्ध लढ्यासाठी आत्मविश्वास निर्माण होणार आहे.

