shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येवले नगरपालिकेने कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी कसली कंबर..!!

येवला: (प्रतिनिधी-संतोष राऊळ)

संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे दि. 12 मे ते 23मे  या कालावधीत कडक लॉकडाउन पाळण्यात आला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून पॉसिटीव्ह रेटही कमी झाला आहे.तसेच नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यात देखील कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसते  आहे. 

            


याच पार्श्वभूमीवर येवले नगरपालिकेने तालुक्यातील शिक्षक व नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या साहाय्याने कोरोना विरुद्धच्या लढाईत अजून एक पाऊल टाकले आहे. 

            


येवले शहरात एकूण 12 प्रभाग असून त्या 12 प्रभागातील ऍक्टिव्ह रुग्णांचे हायरिस्क व लोरिस्क  त्यांचे कॉन्टॅक्ट 24 तासाच्या आत शोधून त्यांच्या पुढील तपासणीचे नियोजन करण्यासाठी नगरपालिकेने आदेश दिले आहेत. याकामी  प्रत्येक प्रभागात चार शिक्षक व एक पर्यवेक्षक असे नियोजन केले असून कोरोना चाचणीत जे रुग्ण पॉसिटीव्ह आले आहेत त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना तसेच आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना जागृत करून त्यांची कोविड 19 ची RTPCR अथवा RAT तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, येवला या ठिकाणी जाण्यासाठी सांगून त्यांना इतर मार्गदर्शक सूचना करण्यास सांगितले आहे .तसेच झालेल्या सर्व्हेच्या नोंदी करण्यास सांगितले आहे. सदर काम नेमून दिलेल्या टीम मधील काही सदस्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन भेट दिली असता  कामकाजाचे नियोजन जाणून घेतले. यावेळी उपस्थितांमध्ये पर्यवेक्षक राजेंद्र जांभुळकर व कार्यरत शिक्षक रविंद्र कोतवाल, राहुल खंडीझोड, विजय पैठणे, आशुतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे,निलेश निकम, ज्ञानेश्वर मासुळे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, संतोष राऊळ यांच्या बरोबरच नगरपालिका कर्मचारी सदावर्ते एस. व्ही.  व प्रवीण नागपुरे यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली.

close