प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
पूर्ण देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण या नवीन संकल्पनेला सर्व विद्यार्थी व पालक सामोरे गेलेले आहेत, या कठीण काळात सुद्धा शाळेचे मार्गदर्शक व संस्थेचे सचिव माननीय रमेशराव आडसकर यांचे मार्गदर्शन व अर्चनाताई आडसकर यांचे नियोजन तसेच प्राचार्य मिश्रा एस एम व सर्व टीम यांचे अथक परिश्रम यामुळे शाळेने ऑनलाइन शिक्षण अत्यंत योग्य प्रकारे राबवले.
दररोज सकाळी 9 ते दुपारी 1. 30 पर्यंत शाळा भरल्याप्रमाणे नियोजित तासीकेप्रमाणे विद्यार्थी पाठ्यपुस्तके घेऊन तयार राहत होती. ऑफलाइन शाळेत होणाऱ्या प्रत्येक तासिका प्रमाणे शाळेतील कठोर व मेहनती शिक्षक वर्ग प्रत्येक वेगवेगळा विषय वेळापत्रकाप्रमाणे वेगवेगळे शिक्षक शिकवत होते. शारदा इंग्लिश स्कूल केज च्या बहुतांश विद्यार्थ्यांना शाळा बंद आहे याचा आभास झाला नसावा असा प्रयत्न शाळेच्या प्रशासनाकडून करण्यात आला या बद्दल सर्व पालक विद्यार्थी व सामाजिक व्यक्तींनी विविध प्रसंगी शाळेचे कौतुकच केले आहे.
इतकेच नव्हे तर शाळेचे विद्यार्थी जे इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत होते त्यांनी नीट च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून दोन विद्यार्थी अनुक्रमे अंडील निखिल व अभिजीत बर्डे यांनी एम बी बी एस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी तर एक विद्यार्थी अवेज कुरेशी सेमी गव्हर्मेंट कॉलेज एमबीबीएस साठी प्रवेशत झालेला आहे. याचबरोबर दोन विद्यार्थ्यांची डेंटल साठी तर एक विद्यार्थी बी ए एम एस साठी व इतर कोर्सेस साठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हे विद्यार्थी नियमित असून रिपीट बॅचचे नाहीत.*
केवळ युट्युब वरचे व्हिडिओ टाकने म्हणजे ऑनलाईन शिक्षण नव्हे हे शारदा इंग्लिश स्कूल केज च्या कठोर मेहनती शिक्षक व शाळेच्या आयटी सेल ने बीड जिल्ह्याला दाखवून दिले आहे.
अत्यंत अल्प फीस मध्ये सी बी एस ई बोर्डाचे अत्यंत उच्च दर्जाची शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणून शारदा इंग्लिश स्कूल केज ने नावलौकिक मिळवला आहे. केज, धारूर व कळंब तालुक्यातील सी बी एस ई मान्यता प्राप्त असलेली शारदा इंग्लिश स्कूल केज एकमेव शाळा आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना चा उद्रेक जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शैक्षणिक वर्ष 2021.22 गतवर्षीप्रमाणे ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.प्रत्येक वर्गात अत्यंत मर्यादित प्रवेश असल्याने पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा संपर्क 9665210111,9420386282,9420386609 या मोबाईल क्रमांकावर करावा असे आवाहन शालेय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

