shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावातील पेशंटला होणार आता गावातच ॲडमिटची सोय ...!


राजुरी  येथे होणार 30 बेडचे कोवीड केअर सेंटर ; सरपंच डॉ. अमोल दुरंदे

प्रतिनिधी । संतोष वायकर :

करमाळा(दि .२७ ) : तालुक्यातील राजुरी येथे 30 बेडचे कोव्हीड केयर सेंटर होणार असल्याची माहिती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली .
काल आपत्ती व्यवस्थापन  समितीची मिटींग पार पडली . प्रथमतः कोव्हीडमध्ये निधन झालेल्या नागरिकांना गावाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली

त्यानंतर मिटींगमध्ये शुकवार पासून कोव्हीड पॉजिटिव्ह रुग्णां साठी राजुरी ग्रामपंचायत व लोक सहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोव्हिड केयर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला 
त्यामुळे उद्यापासून राजुरीत कोव्हीड पेशंटला घरी राहता येणार नाही, गावातील पेशंटला आता गावातच उपचारांची सोय होणार आहे . पुढे येऊ शकणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने  सेंटरचे नियोजन प्रभावी ठरेल.

शाळेमध्ये पेशंटला मोफत उपचार डॉ. अमोल दुरंदे, डॉ. पापा मनेरी, डॉ. विद्या दुरंदे, डॉ. रुकसार मनेरी करणार आहेत. तरी गावातील कोव्हिड रुग्णांनी उद्यापासून शाळेत ॲडमिट व्हावे असे आवाहन सरपंच डॉ . अमोल दुरंदे यांनी केले

लोक सहभागातून होणाऱ्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना ऑलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओ पॅथी औषधे मोफत दिली जाणार आहेत

यावेळी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, पर्यवेक्षक डॉ. जाधव, सामाजिक कार्यकर्ते भानुदास साखरे, ग्रामसेवक श्री रामेश्वर गलांडे, तलाठी लोमटे, मुख्याध्यापक मोरे गुरुजी , पोलिस पाटील माऊली चिंचकर, आरोग्य सहायिका माळी सिस्टर,  आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य , अंगणवाडी सेविका, शिक्षक उपस्थित होते.
close