जेऊर कुंभारी । प्रतिनिधी :-कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे हातावर काम करण्यार्या नागरिकांचे प्रंचड हाल होत आहे.सध्या लाँकडाऊन असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोरोना महामारीने दुसर्या लाट धारण केली असुन या लाटेत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.या संकट काळात नागरिकांना मदत या नात्याने रमजान ईद व अक्षय तृतीया सनाचे औचित्य साधत जेऊर कुंभारी संजय नगर गावातील तरूणांनी स्ववर्गणितून गोर गरीबांना किराणा सामान व सॅनिटाइजर वाटप करण्यात आली.
यावेळी विशेष आर्थिक सहकार्य.धम्मानंद जगताप, अन्सार चिकन शाॅप यांनी केले आहे.यावेळी किरण खांडेकर,साईनाथ गायकवाड,सुनील जगताप,राहुल जगताप,अझर शेख,विकी जगताप,चैतन्य गायकवाड,तुषार गायकवाड,विशाल गायकवाड,सागर जगताप,नितीन वाकोडे,योगेश गुडघे,कृष्णा मलगुंडे,सागर मलगुंडे,रामनाथ सूर्यवंशी,श्रीनाथ पवार,आकाश पवार,विलास बारसे स्वप्नील जाधव आदी तरुणांनी या उपक्रमात सहभाग नोदविला आहे.

