बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणुन घ्या गौतम बुद्ध...!
प्रतिनिधी । आसावरी वायकर :
नगर : (दि.२६) : आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणाऱ्या समाजामध्ये तथागत गोतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धांना एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवुन आम्हाला आजपर्यंत खरा बुद्ध समजुच दिला गेला नाही . जर आम्हाला खरा बुद्ध समजला असता तर आज भारतावर ही वेळच आली नसती. कोण होते बुद्ध ?
1) बुद्धांच पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन गोतम शाक्य ...गोतम हे त्यांच आडनाव आणी शाक्य हे त्यांच्या गणाच नाव...कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण !
2 ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस " कणबी " असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ....मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणी त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला " कणबी " असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला " कुणबी " कुणबी म्हणजे आजचा ओबिसी ! मराठा आणी कुणबी एकच . तथागत गोतम बुद्ध कुणबी मराठा होते . त्यांचे वडील आणी परिवार सर्व शेतकरी होते .
3 ) जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते . दैत्यासुर हिरण्यकश्यपुचा मुलगा राजा प्रल्हाद ..प्रल्हादाची दोन मुले ..कपिल आणी विरोचन ! कपिल हा " सांख्यदर्शन " चा प्रणेता हे आपण आपल्या आयुर्वेदाच्या पहिल्या वर्षाच्या " पदार्थ विद्न्यान " हया विषयात दर्शन शास्रात बघितले आणि अभ्यासलेले आहे . दुसरा जो विरोचन आहे ..त्याला " वृषभदेव असेही म्हणतात .हाच वृषभदेव म्हणजेच " जैनदर्शन " प्रणेता..म्हणजेच पहिला तिर्थंकर होय ! वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजेच 24 वे तिर्थंकर !!
4 ) तिसरा जो गण आहे तो कोलियन म्हणजेच आजचा आपला कोळी समाज ! कोळी समाज हा राजा असलेला समाज होता . गोतम बुद्धांची आई देवी महामाया ही कोळी गणाची होती.याचा अर्थ त्यावेळेस कुणबी आणी कोळी यांच्यात आंतरजातीय विवाह होत होते ..म्हणजेच तेव्हा जातीप्रथा नव्हती .
5 ) चौथा गण द्रविड ! दक्षिणेतले सातवाहन , सातकर्णी हे द्रविड गणातील बुद्धीस्ट राजे होते .
6 ) आणी पाचवा गण गौंड ! महापराक्रमी , दशविद्याप्राप्त , प्राच्यविद्यापंडीत राजा रावण हा गौंड गणातील होता . गौंड म्हणजेच आजचा आमचा आदीवासी समाज . आजही मध्यप्रदेशातील बैतुल आणी विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आमचा आदीवासी समाजाची लोक रावणदहन करत नाहीत . तर तिथ रावणाची आमचा आदीपुरुष म्हणुन पुजा करतात . झारखण्ड राज्यातील आदीवासी समाज राजा रावणाची पुजा करतो .त्याला देव मानतो.
7 ) बुद्धानी प्रचलीत वैदिक व्यवस्थेला छेत देत बुद्धीप्रामाण्यवादी , विद्न्यानवादी , वास्तववादी अश्या विचारांची , धम्माची आणी त्या विचारांचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली.चार आर्यसत्ये , पंचशिल , अष्टांगमार्ग ह्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याच काम केल. याचा परिणाम असा झाला कि बुद्धकाळात भारत " सोनेकी चिडीया " म्हणुन प्रसिद्ध होता. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली . स्री-पुरुष भेदाभेद नष्ट झाला . समाज कर्मकांडापासुन दुर गेला , नालंदा ..तक्षशिला ..विक्रमशीला सारखी विश्वविद्यालये स्थापन झाली , जिथ एका वेळी जगातिल 60000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते . योगा शास्र हे बुद्धांची देण आहे . पतंजली हा नालंदा विद्यापिठाचा विद्यार्थी होता . तो योगाभ्यासात पारंगत होता .अर्थशास्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ.अमर्त्य सेन म्हणतात कि बुद्ध काळात भारताचा GDP ( Gross Develpment Product ) हा जगाच्या GDP च्या 33% होता . यावरुन बुद्धकाळात भारत किती प्रगतीशील आणी विकसीत होता याची आपल्याला प्रचिती येइल !
8 ) बुद्ध काळ हा 800 वर्षांचा ! सम्राट चंद्रगुप्त हा मौर्य .हा पहिला सम्राट तर सम्राट बृहद्रथ मौर्य हा शेवटचा दहावा सम्राट ! त्याची हत्या त्याच्याच सैन्यातील सेनापती पुष्यमित्र शुंग नावाच्या सेनापतीने कपटाने केली आणि बुद्धसाम्राज्याला उतरती कळा आली . भारतात जातीव्यवस्था , स्री- गुलामगीरी , स्री- दास्यता , क्रमिक असमानता ( Greded Inequality ) आणी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा , रुढी परम्परांची निर्मिती झाली . ह्या गोष्टीला फाटा देण्याच काम भविष्यात लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर , महानुभाव पंथाचे प्रवर्तक संत चक्रधर , वारकरी पंथाचे प्रवर्तक संत नामदेव महाराज ..जगदगुरु तुकोबाराया , छ.शिवाजी महाराज , छ. संभाजी महाराज ...महात्मा जोतीराव फुले , शाहु महाराज आणि सर्वात शेवटी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकरांनी केलेले आहे .
.
9 ) ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील 100 महान महापुरुष्यांची " विश्वाचे निर्माते " ( Makers Of The Universe ) म्हणुन एक यादी जाहीर केली . त्यात पहिली चार नाव भारतीय होती ....
A ) तथागत गोतम बुद्ध
B ) वर्धमान महावीर
C ) प्रियदर्शी सम्राट अशोक
D ) विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आम्बेडकर !!
आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे .ज्या ज्या देशांनी बुद्ध स्विकारला ..ते ते देश आज प्रगतिच्या अत्युच्च शिखरावर विराजमान आहेत . मात्र आम्हाला बुद्ध कधी समजुच दिला नाही आणि आम्हीही कधी बुद्धाला समजुनच घेतलं नाही .
जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या ह्या महामानवास ..विश्वनिर्मात्यास कोटी कोटी प्रणाम !
नमो बुद्धाय ..जय भारत !

