shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचारी ठरत आहेत कोविड रुग्णांसाठी देवदूत..?


मोर्शी - मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्र कोविड रुग्णांसाठी वरदान ठरले आहे आतापर्यंत 275 रुग्ण बरे होऊन समाधानाने घरी गेले आहेत.

वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड इन्चार्ज डॉ.सचिन कोरडे व त्यांची टीम अविरत कार्य करत आहे सर्व कोविड रुग्णांना डॉ.रोशन बालबंशी,आरोग्य सहायक विनायक नेवारे,विनय शेलुरे, आरोग्य कर्मचारी सुजित वानखडे,अंजुमा खान,सुलू सलामे,वैष्णवी जोशी, शिवानी हटवार,ज्ञानेश्वर कोरडे,अंकिता हिवरे,राजश्री धुर्वे,आकाश जवंजाळकर,नौशाद हबीब शाह हे सेवा देत आहेत कोविड रुग्णांना चहा,नाश्ता,जेवण व आवश्यक औषधोपचार वेळेच्या वेळी देण्यात येत आहे.

 रुग्णांना तणावमुक्त ठेवून डॉक्टर व सर्व स्टाफ खूप मोलाची कामगिरी बजावत आहेत या कार्याचे कौतुक मोर्शी तालुका व परिसरातील रुग्ण व नातेवाईक करत आहेत..
close