नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील साकत खुर्द गावात नगर- सोलापूर रस्त्यावर (दि.१२) परसराम शिवाजी निमसे (वय१८) राहणार साकतखुर्द हा आपल्या घराकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालवाहतूक ट्रक नगरच्या दिशेने जात असताना खड्डे चुकवण्याच्या नादात रस्ता कडेनी चाललेला परसराम निमसे तरुणाला जोराची धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला.
या वेळी आजुबाजुला उपस्थित ग्रामस्थांनी मालवाहतूक ट्रक चा पाठलाग करून दहिगाव ता.नगर या ठिकाणी हा मालवाहतूक ट्रक पकडला. या सदर घटनेचा नगर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीतील नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.

