लोहा कोविड सेंटर येथे सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते नवीन 4 रुग्णवाहिकेचे लोकार्पण
लोहा (प्रतिनिधी) :-
लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोहा कोविड सेंटर येथे नूतन चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले ,या नवीन चार रुग्णवाहिका काल रविवार पासून कोरोनाच्या संकटात रुग्णसेवेसाठी दाखल झाल्या असल्याने कोरोणाच्या संकटात लोहा तालुक्यातील रुग्णांना या नवीन चार रुग्णवाहिकामुळे मोठा आधार मिळणार असून जलद गतीने रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे सौ. आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले, यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्यामअण्णा पवार ,प्रवक्ते योगेश पाटील नंदनवन कर, पंचायत समिती सदस्य जनार्धन तिडके, वैद्यकीय अधिकारी डॉ.लोहारे उपस्थित होते. यावेळी लोहा कोविड सेंटर येथील रुग्ण वाहिका चालकांच्या शिष्टमंडळांनी आशाताई शिंदे यांची भेट घेऊन रुग्णवाहिका चालकांच्या समस्या मांडल्या.
.
रुग्णवाहिका चालकांच्या घरी जरी नातेवाईक आई, वडील काका काकू आजी यांचा मृत्यू आला तरी रुग्णवाहिका चालकाला सुट्टी मिळत नाही ,24 तास अविरत रुग्ण सेवा करूनही मानधन म्हणून फक्त आठ हजार रुपये पगार मिळतो, 24 तासात कधीच पण सुट्टी मिळत नाही , इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये शासनाने वाढ केली आहे, भत्ता पण वाढवला आहे.
पण रुग्णवाहिका चालकांना फक्त तुटपुंज्या मानधनावर 24तास रुग्णांची सेवा करावी लागत असल्याची खंत रुग्णवाहिका चालकाच्या शिष्टमंडळाने आशाताई शिंदे यांना बोलताना व्यक्त केली असता सौ.आशाताई शिंदे यांनी शिष्टमंडळाला बोलताना लोहा, कंधार मतदारसंघाचे , कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील व मतदारसंघातील रुग्णवाहिका चालकांना नक्कीच न्याय मिळवून दिला जाईल असे यावेळी रुग्णवाहिका चालक संघटनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना सौ.आशाताई शिंदे यांनी सांगितले.
या अगोदर आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नाने कापसी प्रा.आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाली होती या नवीन चार रुग्णवाहिका तालुक्यातील पेनुर प्राथमिक आरोग्य केंद्र, माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्र, कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्र व सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी काल रविवारपासून दाखल झाल्या आहेत, यावेळी पेनुर, माळाकोळी, सोनखेड ,कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी, कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

