नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील गण गटातील गावा प्रमाणे रोटेशन प्रमाणे प्रत्येक गावातील नागरीकांचे लसिकरण करायचे आहे.
आज कोल्हेवाडी येथे लसिकरण पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून वय वर्षं 60 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य शरदभाऊ झोडगे व पं.स. सभापती संदीपजी गुंड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश वाघ,CHO डॉ.सांगळे मॅडम,आरोग्यसेविका सुशिला जाधव,आरोग्यसेवक डेव्हीड वाघमारे हे उपस्थित होते.
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच रविंद्र कुटे,उपसरपंच पोपटराव शेळके,ग्रा. पं.सदस्य सुरज कराळे,दिपक कुटे,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

