बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) ,:-
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शैक्षणिक आणि सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असते, या संघटनेचे राष्ट्रहित, विद्यार्थी हित, शिक्षण हित,आणि शिक्षक हित असे ब्रीदवाक्य आहे. ज्या ज्या वेळेस राज्यावर, देशावर संकट आले त्या त्या वेळेस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता हिरहिरीने राष्ट्रीय कार्यात धावून गेलेला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या संघटनेचे संस्थापक मान.आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मान. राजेशजी सुर्वे राज्याध्यक्ष यांच्या संकल्पने नुसार आज राज्यभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने राज्य भरात आज अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरु आहेत. रक्तदान, अन्नदान,कोविड केंद्र,आर्थिक निधी मदत ,वैदयकीय उपकरणे व साहित्य इत्यादींचे विविध ठिकाणी वाटप सुरू आहे.
सदर उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक 8 मे 2021 रोजी सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग माणगांव शाखा जिल्हा रायगड यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे रुग्णालयात अत्यावश्यक असलेले covid 19 साथ रोगावरील ओमटेक्स इंजेक्शन 400 व्हाईल प्रिपाटोज ing 50 व्हाईल
प्रोसोफेग इंजेक्शन 200 व्हाईल
अड्रेनाईल इंजेक्शन 100 व्हाईल
डेक्सझाकोप इंजेक्शन 150 व्हाईल
एक्साम ग्लोज 500 नग N95 मास्क 500 नग ,ऑक्सिमिटर 8 नग, थर्मलगन 8 नग, फेसशील्ड 50नग, हायड्रोकोर्ट 100mg इंजेक्शन 100 व्हाईल, इनॉसअपरिन इंजेक्शन 50व्हाईल, फेबिविर 500 गोळ्या, इत्यादी महत्वाची औषधे तसेच सॅनिटायझर 5 लि 8 नग N95 मास्क ppe किट इत्यादी साहित्य सदर संघटनेच्या माध्यमातून जमा झालेल्या शिक्षक मदत निधी मधून माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक माननीय डॉ. प्रदिप इंगवले, डॉ डोईफोडे, डॉ देसाई यांना जिल्हाध्यक्ष मान.श्री संजयजी निजापकर सर यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यालयीन मंत्री श्री जितेंद्र बोडके, माणगाव तालुका अध्यक्ष श्री गणेश निजापकर ,कोकण विभागीय प्रतिनिधी श्री संदीप शिंदे सर ,राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री रविकिरण पालवे ,माणगांव तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष श्री सुहास चांदोरकर,श्री अशोक जाधव-अलिबाग पतपेढी संचालक,श्री सुजित भोजने,श्री मुकेश भोस्तेकर, श्री परेश अंधेरे ,श्री संजय पाटोळे माणगांव पतपेढी संचालक,श्री सुधाकर करकरे ,श्री अमोल माने श्री मनोज नाइकडे ,श्री महादेव बांगर,श्री अनिल नाचपल्ले, श्री रत्नदीप चाफे ,श्री बबन मोहिते,श्री दत्तात्रेय शिनगारे ,श्री राजेश पाबरेकर,श्री भाग्येश कुलकर्णी,श्री सतीश ढेपे इत्यादींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सुपूर्द करण्यात आले.

