संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले, उपाध्यक्ष- स्वाभिमानी मीडिया असोशिएशन यांनी मानले आभार..!
प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
पुणे : पत्रकारांना पूर्णतः संरक्षण देण्यात येईल.मात्र याचा कोणीही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये.पत्रकार खरे समाजाचे चौथे बिंदू असून एक महत्वपुर्ण प्रसार माध्यमांचे साधन पत्रकारच आहेत.
सध्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी बातम्या देण्याचे काम करीत आहेत.कोरोना कालावधीत कायम भितीची टांगती तलवार पत्रकारांच्या डोक्यावर लटकत आहे.मात्र अशा अशा अवस्थेतही समाजाचे विविध प्रश्न,समाजाच्या विविध समस्या सोडविण्याच्या हेतूनेच प्रसिद्धीच्या माध्यमातून आपले काम करीत असतात.
त्यामुळे पत्रकारांच्या विरोधात कुठल्याच गैरकृत्याला पाठीशी घालण्यात येणार नाही.पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा आहे.चांगल्या कामाचा,विचारांचा व कृतीचा पुरस्कार तर वाईट प्रवृत्ती,गैरवर्तन आणि समाज विघातक कृत्यांचा धिक्कार करणारा महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार आहे.
पत्रकारांना पूर्णतः संरक्षण देण्यात येणार आहे.मात्र याचा कोणीही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये.कायद्याचा वचक सर्वांवर राहिलाच पाहिजे.पत्रकार विरोधी होणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.असे मत पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख व्यक्त केले.
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हास्तरीय ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते.यावेळी अधिक्षक डॉ.देशमुख यांनी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्ह्यात आदर्शवत काम असल्याचे सांगून,महाराष्ट्र पत्र परिषद,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ,पुणे जिल्ह्यातील विविध मराठी पत्रकार संघाचे कौतुक करून,पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश संलग्न पुणे जिल्हा महिला मंच या पत्रकार संघटनेची पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हास्तरीय झूम अँपवर ऑनलाईन बैठक पार पडली.
महिलांचे संरक्षण व त्यांचे हक्क जपण्याचे काम करण्यात आम्ही कायम प्रयत्नशील असून,महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणि जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात आम्ही आहोत.पत्रकार परिषदेला संलग्न असणाऱ्या पटीने जिल्हा महिला मंचच्या जिह्यातील विविध पदाधिकारी जर जिल्ह्यात विविध भागात काम करण्यास सक्षम असतील तर अशा मंचच्या कुशाग्र,सक्षम असणाऱ्या महिलांना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या भरोसा किंवा इतर महिला समित्यांवर घेण्यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे महिलांचे विविध प्रश्न,समस्या सोडवून महिलांना न्याय देण्याच्याच दृष्टिकोणातून आमचे काम चालू आहे.या पत्रकार परिषदेला समग्न असलेला महिला मंच पुणे जिल्ह्यात चांगली कामगिरी करीत आहे.असेही पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले.
याबद्दल पुणे जिल्हा ग्रामीण पो.अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख साहेब यांचे संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले,उपाध्यक्ष- स्वाभिमानी मीडिया असोशिएशन यांनी आभार मानले.
साहित्यिक लेखक नामदेव ज्ञानदेव भोसले मराठी पुस्तक भेट देतांनी त्यावेळी एक जुनी आठवणीतले क्षणचित्र... अशाच प्रकारे साहेबांनी पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

