shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या 56जणांपैकी 5जण पॉजिटीव्ह..!!


प्रतिनिधी । मोहन शेगर, :-
 सोनई :- सोनईत दरोरोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिक शासकीय नियमानाचे पालन करताना दिसत नसल्याने आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, व सोनई ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन विनाकारण गावात फिरणाऱ्याची बस स्थानक व राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यात ५६ नागरिकांचे चाचणी घेण्यात आली, त्यात ५ जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना शनिशिंगणापूर येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे दरम्यान ग्रामस्था मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



या परिसरातील रस्त्यावर बसलेले भाजीविक्रेते,फळ विक्रेते,व विनाकारण फिरणारे यांची तपासणी करण्यात आली. सोनई गाव दिवसेंदिवस तालुक्यात तिसऱ्या क्रमांकावर येत असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संबंधित विभागाने काही दिवसासाठी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सरपंच धनंजय वाघ यांनी सांगितले.

सदरची मोहीम राबवताच कामाव्यतिरिक्त मोकाट फिरणाऱ्याची मोठी संख्या अचानक कमी झाली आहे. या मोहिमेत सोनाईचे स.पो. नि.रामचंद्र कर्पे,सहकारी बाबा वाघमोडे, आव्हाड,यांचे सह वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे,डॉ. जावळे,सरपंच धनंजय वाघ,सदस्य नितीन दरदले,ओहळ,आदी सामील झाले होते.
close