shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत असली तरी संकट अजून संपले नाही, नागरिकांनी काळजी घ्यावी : दत्तात्रय भरणे.

कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत असली तरी संकट अजून संपले नाही, नागरिकांनी काळजी घ्यावी : दत्तात्रय भरणे.

इंदापूर प्रतिनिधी: दि. २९ मे २०२१

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत असली तरी संकट अजून संपलेले नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरवासियांना केले.

आज (दि. २९) रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना विषयी आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी इंदापूर नगरीच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, डाॅ.सुहास शेळके, डाॅ.नामदेव गार्डे तसेच सर्व खात्यांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, म्युकरमाकोसीसचा संभाव्य धोका लक्षात घेता दि. १ जून रोजी पासून दि.७ जून या कालावधीत तालुक्यात कोविड मधून बरे होऊन घरी परतलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी शिबीर आयोजित करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.

तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक आहे. हे लक्षात घेऊन तालुक्यातील बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्सची टीम तयार केली आहे. तसेच लहान मुलांच्या उपचाराकरीता बेड, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन दिले आहेत. हे साहित्य लवकरच ते वैद्यकीय विभागांमध्ये येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

नागरिकांनी आपल्या घरातील लहान मुलांची काळजी कशी घ्यावी याकरिता मार्गदर्शक पुस्तीकांचे गावोगावी वाटप करण्याच्या सूचना यावेळी भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, तिसऱ्या लाटेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच दवाखान्यामध्ये मुलांच्या पालकांचीही सोय करावी असे सांगितले.

या बैठकीत इंजेक्शनचा तुटवडा, वापरलेल्या वैद्यकीय साहित्याची विल्हेवाट, जनरेटर, वापरात येत असलेली निष्कृष्ट दर्जाची वैद्यकीय उपकरणे, नागरिकांचे होम आयसोलेशन याविषयी चर्चा झाली.

close