नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील सर्वच गावांनी उपलब्ध लसी प्रमाणे 'गाव तिथे लसिकरण मोहिम" पार पडली जात आहे.तसेच कोरोना संख्या कमी होत चालेली आहे.अहमदनगर जिल्हा काही तालुक्यातील १ जुन नंतर नियम शिथिल होण्याची शक्यता आहे.
गाव तिथे लसीकरण कँम्प मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील आठवड येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून वय वर्षं ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण कॅम्प सोबत रॅपिड अँटीजेन तसेच RT-PCR टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी टाकळी काझीचे सरपंच शहाजी आटोळे, वैद्यकीय अधिकारी प्रियंका शेंदुरकर, डॉ.सांगळे मॅडम, परिचारिका देठे,फुंदे, लिपणे, सरपंच राजेन्द्र मोरे,मा.सरपंच सुनिल लगड,उपसरपंच बाबासाहेब मोरे,मा. उपसरपंच भाऊसाहेब लगड,शिवसेना उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड,ग्रा.प.सदस्य अशोक चोभे,अतुल लगड सर,उद्योजक महादेव दाताळ,महादेव मोरे,जालिंदर लगड,वैभव मोरे,ग्रामसेवक कोतकर भाऊसाहेब,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी हा कँम्प यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

