नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील दक्षिण भागातील गावातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत गुंणवडी ,तांदळी गावात रॅपिड ॲटीजेन टेस्ट कॅम्पचे आयोजन माजी उपसभापती रविंद्र भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या गावातील संशयित व्यक्तीनी कोरोना तपासणी करु घेतल्याने गावातील वाढता धोका टळु शकतो.बांधीत रुग्णांना पुढील उपचारासाठी आरणगाव चीचोंडी पाटील येथील शासकीय कोविड सेंटर दाखल करण्यात आले आहे.
तर कही व्यक्ती खाजगी हाॅस्पिटल मध्ये दाखल झाले.हा कँम्प यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल ससाणे, सविता ससाणे,तांदळी चे सरपंच बाळासाहेब ठोंबरे,गुंणवडी चे संरपच रंजना शाम साळवे, उपसरपंच रावसाहेब शिळके, वाल्मिकी काका नागवडे, महेंद्र शेळके,उपसरपंच वैभव मुनफन,ग्रा.सदस्य दिपक घिंगे, ग्रामसेवक शरद पिंपळे, योगेश शेळके,राजु कोकाटे, डॉ.शेळके, आशा सेविका रेखा आंधळे, सामाजिक कार्यकर्ते संजय पवार हा कँप यशस्वीतेसाठी आदींनी परिश्रम घेतले.

