shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात यावी.महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी..!



कोपरगाव : विशाल लोंढे
राज्यात  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांना प्राधान्यांने लस दिली आहे. त्याच पद्धतीने राज्यातील प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांना देखील लस देण्यात यावी अशी मागणी कोपरगाव येथील महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतीने राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील संजीवनी कोविड सेंटरला राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली त्यावेळी पञकार संघाने निवेदन देण्यात आले. 

पञकार संघाने दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आले आहे की, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांचे लसीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.


महाराष्ट्राने कोरोनाच्या लढाईत अनेक महत्वाचे निर्णय घेत कोरोनाला अटकाव करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहे. सततच्या वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्सेत घट व्हावी यासाठी आपण लसीकरणावर जोर दिला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपण प्राधान्याने लस दिली तशीच आता पत्रकारांना देखील तातडीने लस देणे गरजेचे आहे.

देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्याचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी देखील निवेदनाव्दारे करण्यात आली. 

यावेळी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष मनिष जाधव, जनार्दन जगताप उपअध्यक्ष, हाफीज शेख शहराध्यक्ष, विनोद जवरे तालुका सचिव, विजय कापसे तालुका सहसचिव, स्वप्नील कोपरे उपशहरध्यक्ष सोमनाथ डफळ सदस्य आदी उपस्थित होते.
close