shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाळकीच्या स्वस्त धान्य दुकानावर पोलिसांची कारवाई.

वाळकीच्या स्वस्त धान्य दुकानावर पोलिसांची कारवाई ...! अन्नधान्यात आढळून आली  तफावत...!!

प्रतिनिधी । शिवा म्हस्के :
वाळकी : (दि . २८ ) : नगर तालुक्यातील वाळकी या गावात स्वस्त धान्य दुकानातील मालात तफावत व फेरफार आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर हकीकत अशी की वाळकी येथे अरुण शिवाजी बोठे याचे स्वस्त रेशन धान्य दुकान असून दि .२६ मे रोजी दुपारी ४:०० वाजता येथे तपासणी केली असता अन्नधान्यात तफावत व फेरफार झाल्याचे आढळून आले . 

पुरवठा निरिक्षक वैशाली शिकारे यांच्या फिर्यादी वरून  स . पो. नि . व प्रभारी अधिकारी राजेंद्र सानप,  अमलदार बी.व्ही सोनवणे , पोसई तपासी अमलदार राऊत साहेब , यांनी सदर घटनेचा पंचनामा करून आज दि . २७ रोजी फिर्याद दिल्याने अत्यावश्यक वस्तु अधिनियम ३ व अत्यावश्यक अधिनियम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
close