आपण जन्माला आल्यापासून समाजाच्या अंगाखांद्यावर खेळतो. कर्तृत्ववान झाल्यानंतर प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की मला समाजाने जे काही दिलेलं आहे ते मला परतफेड करणे क्रमप्राप्त आहे.
आता हे कसे करायचे?
तर त्यासाठी एक सोपा मार्ग आहे. दर आठवड्याला किमान दोन तास चिंतन करावे.
मी समाजाकडून काय घेतले आणि आता मी ज्या संपत्तीचा धनी आहे त्यातून समाजाला काय देऊ शकतो.
असे चिंतन करून मग आपल्या समविचारी बंधू-भगिनींना एकत्र बोलून त्यांच्याशी आठवड्यातून एक दिवस, दोन तास चर्चा करावी. आपण समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय करू शकतो याचे सार्वजनिक चिंतन करावे.सामाजिक ऋण फेडणे व त्या बाबतीत चर्चा करणे हे शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे .
जेव्हा समाजाला देण्याची भावना आपल्या मनामध्ये संक्रमित होते तेव्हा शरीरातील लोभ, मोह, माया, स्वार्थीपणा, तिरस्कार, मत्सर, लालसा, अहंकार असे विविध अवगूण शरीराबाहेर फेकले जातात.
जेव्हा अहंकार देहात तयार होतो तेव्हा अहंकारातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून रक्ताभिसरण क्रिया असंतुलित होते. यकृताचे कार्य, स्वादुपिंडाचे कार्य, मुत्राशयाचे कार्य सर्वच्या सर्व असंतुलित होत शरीर रोगाचे बळी ठरते. अर्थात अहंकार टाळला की या क्रिया बंद होऊन शरीर संतुलित होते. सर्व इंद्रिये संतुलित राहतात. त्यासाठी ज्यांना निरोगी राहायचे आहे त्यांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी चिंतन करावे.
चंद्रकांत शहासने. पुणे
९८८१३७३५८५

