shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा .आ. राजीवजी राजळे यांच्या कोविड केअर सेंटरला पंचपक्वाणचे जेवण....!


पुरणपोळीच्या आस्वादाने रुग्णांनी केला आनंद व्यक्त....!

प्रतिनिधी । आसावरी वायकर :

पाथर्डी (दि.२४) : येथील आदी फाऊंडेशन,पाथर्डी नगरपरिषद व खरेदी विक्री संघ, यांचे विद्यमाने सुरू असलेल्या मा.आ.राजीवजी राजळे कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना  खरेदी विक्री संघाचे संचालक  श्री.संदीप (बंडुशेठ) पठाडे यांच्याकडून  पुरणपोळी सह पंचपक्वाण चे भोजन  जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुलदादा राजळे यांच्या हस्ते  देण्यात आले.


राहूल दादांनी या गोड उपक्रमाचे कौतुक केले . तर रुग्णांनी पंचपक्वाण जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला . श्री. संदीप पठाडे यांनी रुग्णांना स्वादिष्ट व रुचकर जेवण मिळाल्याचे समाधान व्यक्त केले .

पेशंटच्या जेवणा नंतर पत्रकार बंधू व कार्यकर्त्यांनाही या जेवणाचा दर्जा व आस्वाद घेण्याची विनंती केली असता राहुल दादा राजळें सह पत्रकार बंधू व कार्यकर्त्यांनी या भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
       
यावेळी  नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील ओहळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब अकोलकर, शहराध्यक्ष अजय भंडारी सर,  नगरसेवक नामदेव मामा लबडे, महेश बोरुडे, डॉ . रमेश हंडाळ, अनिल बोरुडे, मंगलताई कोकाटे, सिंधुताई साठे, बंडूशेठ बोरुडे, पांडुरंग सोनटक्के, जमीर आतर, डॉ . पांडुरंग लाड, सुरेश बाबर मामा, अजय साठे, तसेच जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, उमेश मोरगावकर, नारायण पालवे, राजेंद्र भंडारी, दादासाहेब येढे सर, संदीप शेवाळे, संतोष गांधी उपस्थित होते.
close