shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देत मोबाईलचे दुकान चालू...!


फोंडशिरस गावातील मोबाईल दुकानावर पोलिसात गुन्हा दाखल ...!

प्रतिनिधी । संतोष वायकर:

माळशिरस (दि .२३) :  तालुक्यातील फोंडशिरस गावातील मोबाईल शॉपी लॉकडाऊन मध्ये उघडी ठेवल्याने नातेपुते  पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करण्याचा ठपका मोबाईल शॉपी मालकावर ठेवण्यात आला आहे.

मा .जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  सोलापूर यांचे कडील आदेश क्र. जावक क.२०२१ डिसीबी /०२/ आरआर/२१७७/ सोलापुर दि१४/०५/२०२१ अन्वये संपूर्ण सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्रा मध्ये असणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर सर्व व्यवसाय करणारी व्यापारी दुकाने, व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. असा
दि. .१५ मे रोजी सकाळी ७.०० वा. पासून ते दि. १ जून रोजीचे सकाळी ७.०० वा. पर्यंत आदेश लागू करण्यात आला असताना देखील अमोल भिमाराव रणदिवे (वय २७ ) रा. फोंडशिरस ता. माळशिरस यांनी त्यांचे मालकीचे शौर्य मोबाईल शॉपी नावाचे दुकान हे वरील आदेशाचे उल्लंघन करून चालू ठेवलेले स्थितित आढळून आले.

म्हणून त्यांचे विरुद्ध भा. द. वि. कलम १८८,२६९,२७० प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१( ब) प्रमाणे नातेपुते पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
close