कोपरगाव । प्रतिनिधी :
दि.२३ :- महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे कोरोना रुग्णांसाठी कोपरगावमध्ये सुरू असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर मध्ये दि.२३ मे २०२१ रोजी 'जाऊ द्या ना राव' हा भन्नाट विनोदी कार्यक्रम यशस्वी रितीने संपन्न झाला. आदरणीय आमदार श्री. आशुतोषजी काळे साहेबांच्या सहकार्याने कोरोनाबाधित रुग्णांचे मनोरंजन करण्याची संधी "जाऊ द्या ना राव" च्या टीमला मिळाली.यावेळी कलाकारांनी कोरोना रुग्णांचे कमालीचे मनोरंजन केले. यामुळे तेथील रुग्णांनी सदर कलाकारांना भरभरून प्रतिसाद,प्रेम व आशिर्वाद दिले.
"जाऊ द्या ना राव " टीममधील प्रमुखअभिनेते सुमितजी श्रीगोंदेकर यांना कोरोना योध्दा म्हणून मिळालेले सन्मान पत्र..!
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिग्दर्शक , दीपक रुपचंद गायकवाड , अभिनेते सुमित सुभाष श्रीगोंदेकर, सावली गायकवाड, अजिंक्य सोनावणे , अक्षय शिंदे , अनिकेत भुजंग, सचिन खेत्रे, संपत गवळी , मंगल आवटे , सिद्धांत झेंडे, शैलेश शिंदे , आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम झाल्यानंतर अभिनेते सुमित सुभाष श्रीगोंदेकर आणि दिग्दर्शक दीपक रुपचंद गायकवाड यांनी तेथील रुग्णांची भेट घेऊन त्यांचे कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा त्यांनी टीमला भरभरून प्रेम आणि आशिर्वाद दिले...!!

