या आजारा पासून सुरक्षित रहाण्यासाठी काळजी घेणे आवश्यक...!
प्रतिनिधी । आसावरी वायकर :-
नगर (दि.१६) : 'कोविड' मधून बरे झालेले रुग्ण म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) ह्या रोगापासून सुरक्षित रहावेत ह्यासाठी काही माहिती आणि सुचना देण्यात आल्या आहेत.
म्युकरमायकोसिस Mucormycosis (काळी बुरशी) काय आहे ?
अति जलद पसरणारा बुरशीचा रोग, जो मुख्यतः नाक, डोळे आणि मेंदू ह्यांना बाधित करतो. वेळेवर उपचार लाभल्यास हा रोग पूर्ण बरा होऊ शकतो परंतु वेळेवर योग्य उपचार न केल्यास रुग्ण त्याचा डोळा दृष्टी किंवा प्राण देखील गमावू शकतो.
हा आजार होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत..!
1. अतिरिक्त मधुमेह.
2. करोना उपचारादरम्यान स्टीरोइड अथवा टोसिलीझुमॅक सारख्या औषधांच्या अतिरिक्त वापराचा परिणाम.
3. कृत्रिम श्वासोच्छवास आणि मशीनचा अतिवापर.
4. प्रमाणाबाहेर प्राणवायूचा वापर .
5. रोग प्रतिकारशक्ती कमी असणे .
या आजाराची लक्षणे ....
1. चेहऱ्याचे स्नायू दुखणे
2. अर्धशिशी
3. नाक चोंदणे सूज येणे
4. एका नाकपुडीतून रक्तस्त्राव
5. चेहरा अथवा डोळ्यावर सूज
6. एक पापणी अर्धी बंद राहणे
7. दात दुखणे किंवा हलू लागणे
हे करावे....
1. रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण.
2. कान, नाक, घसा तज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी .
3. वरील लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क .
4. डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉइड न घेणे .
5. टूथ ब्रश / मास्क वरचेवर बदलणे.
6. दिवसातून एकदा गुळण्या करणे .
अन् वैयक्तिक स्वच्छता ठेवणे .
या पुढील गोष्टी करू नयेत ..
1. छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये .
2. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये .
3. वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉइड्स चे सेवन करावे .
वेळेवर योग्य उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे कारण रोग बळावल्यास दृष्टी आणि जिवाला धोका पोचू शकतो.
नेत्र शल्य चिकित्सा विभाग एच. वि. टी. वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन्. कूपर रुग्णालय मुंबई यांनी प्रसारित केलेली माहिती जनहितार्थ देण्यात आली आहे.

