गुलमोहर फुलांनी फुलला
वडाळा महादेव । वार्ताहर (दिलीप नवले):-
उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू होणार.पावसाळ्यात पावसाची चाहूल आकाशात ढग निर्माण होऊन पडणाऱ्या पावसांच्या थेंबानी होते.
उन्हाळ्यात रुक्ष अशा अवस्थेत असणाऱ्या गुलमोहर हा ज्या वेळी लालसर रंगाची उधळन करत आपल्या फुललेल्या फुलांची आठवण करून देत पावसाळा सुरू होणार याची जाणीव करून देत असतो.
जागोजागी आपणास गुलमोहर झाडावर फुललेल्या या मनमोहक फुलांकडे मन आकर्षण झाल्या शिवाय राहणार नाही.
निसर्गाच्या सानिध्यात राहताना त्याला अनुभवायला मिळते आणि आपल्या मनात त्याविषयी आकर्षण ही निर्माण होते. आपल्या आसपास असणाऱ्या गुलमोहोर झाडावर फुललेल्या राजाराणी पाकळ्या पहाण्याची ही अनोखी संधी अनोखा अनुभव..!

