"पर्ण " या मराठी लघुपटाने आतापर्यंत कोचीन आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल व नंदुरवार / स्प्राउटिंग सीड इंटरनेशनल शोर्ट फिल्म फेस्टीविल मध्ये पुरस्कार ट्रॅव्हनकोर इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये पुरस्कार प्राप्त करून अमरावतीच्या मातीत तयार झालेला "पर्ण" लघुपटाने अभिमानाचा झेंडा फळकवला आहे.
"पर्ण " या लघुपटाच्या माध्यमातून समाजातील चांगली व वाईट दोन्ही बाजू दाखविण्याचा प्रयत्न या लघुपटमध्ये केला आहे...! बिकट परिस्थितीतही मार्ग काढणारी आई... तिची धडपड पाहून मास्क व सॅनिटायजर देणारी ती स्त्री... हे महत्वाचे पैलू...!!
अनेकांनी कोरोनाच्या संकटात अनेकांना होईल त्या परीने मदत केली व माणुसकीचे दर्शन दिले. अशा सर्वांनाच हे पुरस्कार समर्पित..! "पर्ण" या लघुपटाचे कथा संकल्पना दिग्दर्शक सागर भोगे यांनी केले असून निर्माता अक्षय खल्लारकर आहेत.
तसेच कलाकार श्रुतिका गावंडे, भाग्यश्री देहानकर, भारत वानखडे, मनीष टावलारे,आशिष सुंदरकर चेतन उंब्रकर, श्रावणी तांत्रपडे, गौतम्रो दामोदर.बाल कलाकार, श्रावणी सगणे असून संकलन भारत वानखडे सहाय्यक संचालकआशिष सुंदरकर,क्रिएटिव्ह डायरेक्टर कीर्ती नंदन इंगोले छायांकन अक्षय खल्लरकर, सह छायांकन विशाल वानखडे. पार्श्वसंगीत संतोष काकडे आहेत. हे यश संपूर्ण पर्ण लघुपटाच्या टीमचे आहे. असं मत दिग्दर्शक सागर भोगे यांनी व्यक्त केले. त्यांच्या ह्या यश्याबद्दल विनय शेलुरे,धर्मा वानखडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

