अमरावती:- नवाडा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल नुकताच दिनांक 9/5/21रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडला या फेस्टिव्हल मध्ये 'फुग्गा' फिल्म करिता बेस्ट युथ डायरेक्टर अवॉर्ड 5th अमरावतीचे युवा दिग्दर्शक,लेखक,अभिनेते धर्मा वानखडे यांना देण्यात आला .
धर्मा वानखडे यांनी आतापरेंत फुग्गा, लाल खून, एनसीडी,रेस, माझं गाव माझा देश, अश्या अनेक सामाजिक शॉर्ट फिल्म चे लेखन दिग्दर्शन व निर्मिती केली असून त्यांनी त्यात अभिनय सुद्धा केला आहे.तसेच राणी बेटी, चांदकी सोकडा या डाक्युमेंट्री फिल्म चे दिग्दर्शन केले असून त्यांच्या सर्वच फिल्म ला आतापरेंत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे.
त्यांनी लोकगीतांची सुद्धा निर्मिती केली आहे. त्यांच्या फुग्गा फिल्म ने तर आतापरेंत 20 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले असून,सिनेमा क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या फेस्टिव्हल मध्ये 55 देशांमधून 78 भाषांमध्ये तब्बल 1600 फिल्म आलेल्या होत्या. तर आस्ट्रेलिया,रशिया, इटली,ब्राझील, स्वीडन , अमेरिका,भारत अश्या अनेक देशातील 11 परीक्षकांनी फेस्टिव्हल चे परीक्षक म्हणून कामं पहिले. तर फेस्टिव्हल डायरेक्टर राहुल वर्मा हे होते.
फिल्म फेस्टिव्हल चे प्रायोजक प्रगती फाउंडेशन चे मोहम्मद कामरान व आस्ट्रेलिया चे वायएसये स्क्रीन मीडिया हे होते.सदर फेस्टिव्हल ची बॉलिवूड, हॉलिवूड मधून अनेक दिग्गज कलाकारांनी प्रशंसा केली असून धर्मा वानखडे यांचे सिनेमा क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे..

