आजार शरीराला होतो मनाला नाही . मन मजबुत बनवा ...!
प्रतिनिधी । आसावरी वायकर :
अ .नगर (दि.२२) : करोनासारख्या महामारीच्या काळात भारतात प्रशासन विविध उपाययोजना आखून कोरोनाबाधित रुग्णांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे .विविध संस्था, राजकीय पक्ष , पुढारी कोवीड १९ विषाणूच्या विरोधात सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत . तसेच कोवीड बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाकाईकांसाठी या आजाराला घाबरून न जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन होणे खुप गरजेचे आहे.
म्हणूनच जैन समाजाचे मुनिश्री प्रमाणसागरजी महाराज यांनी करोनाविषयी सुंदर माहितीपूर्ण विचारांचे मार्गदर्शन संपूर्ण मानव समाजाला केले आहे .
महाराजांनी सांगितले की , करोना आजाराला घाबरू नका .मनाला मजबुत करा , ही महामारी आली आहे तर ती जाणारही आहे , तुमचे मन मजबुत असेल तर तुम्ही या आजाराला हरवू शकाल , दुसरे कित्येक आजार नीट होतात, कोरोना सारखा आजारही पूर्णतः नीट होईल नष्ट होईल.
आपल्या मनाला अध्यात्मिक बनवा, करोना आजार हा शरीराला आहे मनाला नाही, सावधानता बाळगा, एकमेकांच्या संपर्कात येवु नका, घरीच रहा सुरक्षित रहा, ही तुमची जबाबदारी आहे, प्रकृतीच्या प्रकोपाला सर्वांनाच झेलावे लागत आहे, पण कधीतरी त्यात सुधारणा होईल आणि पूर्णपणे सर्व ठिक होईल.
या पृथ्वीतलावर महामारी ही काही पहिल्यांदाच आली नाही. कित्येक शतकांपासून महामारी ठराविक अंतराने येतच आहे. ही वैश्विक आपत्ती आहे. सर्वसमाजाने एकत्र येवून याचा नायनाट करायला हवा.

