shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करोनामुक्त होऊन घरी जाताना प्रत्येकाला झाडाचे वाटप ...! चॅरिटेबल ट्रस्टचा उल्लेखनीय उपक्रम ... !!!



इतर कोविड सेंटर प्रमुखांनी संपर्क साधावा ... लक्ष्मण बुधवंत..!

प्रतिनिधी । आसावरी वायकर :-

करमाळा (दि .22):कालिंदा फाऊंडेशन आणि वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव, यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील व रावगांव येथील लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधील प्रत्येक पेशंटला डिस्चार्ज देताना आपल्या ट्रस्टच्या वतीने एक झाड भेट देण्यात येत आहे.

आज आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. म्हणून सर्व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी बोलताना ट्रस्टचे संस्थापक लक्ष्मण बुधवंत म्हणाले की, लोकांना जाताना आमच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. तरी ही योजना तालुक्यातील प्रत्येक कोविड केअर सेंटर साठी असणार आहे. त्यामुळे कृपया प्रत्येक गावातील कोवीड केअर सेंटरच्या प्रमुखांनी 9370835284 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रावगांव येथील लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधील  करोनामुक्त पेशंटला झाड देताना रावगांव मा. उपसरपंच सुभाष पवार, डॉ . शिंदे मॅडम, नवनाथ ससाणे सर, भास्कर भाऊ पवार, प्रशांत शिंदे,उपस्थित होते .

सर्व स्तरातून या उल्लेखनीय उपक्रमाचे कौतुक होत आहे. 
close