अलिबाग येथील नागांव ग्रामपंचायत येथे लसीकरण केंद्रासाठी परवानगी ,सरपंच निखिल मयेकर ,उपसरपंच आणि सदस्य यांच्या पाठपुराव्याला यश..!
राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-
नागांव ग्रामपंचायत येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र उपलब्ध .., त्यासोबत ग्रामपंचायत करणार अपंग नागरिकांना मोफत ने आण करण्याची व्यवस्था..!
नागरिकांच्या सोयीसाठी नागांव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर, उपसरपंच आणि सर्व सदस्य यांनी या कोविड कालावधीत नागरिकांना कोरोना लस घेणे सोयीचे व्हावे याकरिता नागांव येथे लसीकरण केंद्र मिळावे यासाठी प्रयत्नशील होते.
त्याकरिता अलिबाग जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व रायगड जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करून सातत्याने पाठपुरावा करत होते.
नागांव आरोग्य केंद्रामध्ये डॅाक्टर्स उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र सुरू होण्यास अडचण होत होती, सरपंचांनी नागावमधील प्रायव्हेट डॅाक्टर्स च्या सहाय्याने त्वरित ही अडचण दूर करीत नवीन प्रस्ताव सादर केला होता,
नागांव सरपंच निखिल मयेकर व सर्व पंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्याने सदर मागणी मान्य झाली असून इतर सोपस्कार पूर्ण करून लवकर हे केंद्र सूरू करण्यात येणार आहे.
सदर केंद्र हे नागांव ग्रामपंचायत समाजमंदिर ( ग्रामपंचायत हॅाल ) नागांव येथे सुरू करण्यात येणार आहे. सदर केंद्रावर सध्याच्या शासनाच्या नियमानुसार ४५ वर्षावरील नागरींकांचे लसीकरण होणार आहे.
टोकन पद्धतीने नोंदणी व इतर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.असे नागाव ग्रामपंचायत वतीने सांगण्यात आले आहे.

