shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरकारच्या विरोधात थाली- टाली बजाव आंदोलन: ना . बच्चु कडू यांचे आवाहन..!


प्रतिनिधी : संतोष वायकर
करमाळा ( दि .22 ) :   ना .बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहना नुसार खत दरवाढी विरोधात व तूर, मूग व  उडीद विनाकारण आयात धोरणा विरोधात थाली बजाव, टाली बजाव आंदोलन करण्यात आले.


 यावेळी शेतकऱ्यांचा एक जुटीचा विजय असो, मोदी सरकारचा धिक्कार असो, गरज  नसताना कडधान्याचे आयात करणाऱ्या या सरकारचे करायचं काय खाली मुंडक वर पाय ... या घोषणांच्या निनादात  सर्व प्रहार सैनिकांच्या व शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रतिसादाने करण्यात आले

याकरीता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा  तालुक्यातील शहर व  ग्रामीण भागामध्ये प्रहार चे  थाली - टाली बजाओ आंदोलन संपन्न झाले. केंद्र शासनाच्या तूर, मूग , उडीद या धान्याच्या आयात धोरणाच्या विरोधात आज टेंभूर्णी येथे व सोलापूर जिल्ह्यातील  सर्व तालुक्यातील सगळ्याच गावात चौकाचौकात संध्याकाळी  ६ वाजता कोरोनाचे नियम पाळून आंदोलन संपन्न झाले .

या आंदोलना साठी सोलापूर जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष  रमेश पाटील  करमाळा तालुका  अध्यक्ष संदिप तळेकर करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार , सोनू मखरे , विजय पवार आणि इतर सर्व प्रहार सैनिक उपस्थित होते .
close