पुनाळ/प्रतिनिधी(सुरेश वडर): कोरोना महामारीची दुसऱ्या लाटेची तिव्रता वा-याच्या गती पेक्षा वेगाने वाढत असुन,दिवसेन-दिवस कोरोना बाधितांची आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
कोरोना संसर्गजन्य विष्याणूची साखळी तोडण्यासाठी लाॕकडाऊन ही संकल्पना राबवली. त्याच बरोबर शहरी भागात वार्ड/प्रभाग समित्या व ग्रामीण भागात कोरोना ग्राम समित्या मा.जिल्हाधिकारी,मा.उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांच्या आदेशाने या समित्या स्थापन झाल्या.
या समिती मध्ये सरपंच,उपसरपंच व ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य,जिल्हा परिषदेचे सदस्य,पंचायत समितीचे सदस्य,ग्रामसेवक,तलाटी,कोतवाल,पोलीस पाटील,आरोग्य सेवक,कृषी सहाय्यक आशा स्वयंम सेविका,अंगणवाडी सेवीका,यासह स्थानिक स्थरावरील विविध क्षेत्रातील मान्यवर या समित्या मध्ये आहेत.
शासनाने कोरोना विषाणू बाबत वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करुन सर्व जनते पर्यंत पोहचवून त्यांना कोरोना पासून मुक्ती मिळवुन देणे.
कोरोना बाधीत रुग्णांच्या घरी जावुन त्यांना कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेण्यासाठी मदत करणे.रुग्णाच्या फस्ट काॕन्टॕक्ट मधील व्यक्तींचे कोरोना चाचणी करण्यासाठी पाटवणे,तसेच सेंकड काॕनटॕक्ट व्यक्तीचे यादी तयार करणे.
सदर येरीया कंटेमेन्ट झोन येरीया असे जाहीर करणे.जेणे करुन कोरोना संक्रमणचा विळाखा थांबला पाहिजे.या उद्देशाने जनतेस प्रेरीत करणे हाच मुळ हेतु असतो.
पण सद्य परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णाच्या घरी कोरोना ग्राम समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य गेले असता सदर घरातील व्यक्ती म्हणतात की,आंम्हाला ताप,सर्दी,खोकला, अंगदुखी यासह कसलाही त्रास नाही.आंम्ही कोरोना टेस्ट करणार नाही.हाच मुद्दा जर ग्राम समितीने जोरधरुन व गंभीरपणे घेतला तर,जनते कडून अशी प्रतिक्रिया येते की,तु नुसतं मत मागायला ये,मग तुला दाखवतो इंगा?अशा प्रकारच्या ग्रामीण भाषेतील नाना प्रकारच्या विविध ढंगात सुरमय लहरी ऐकाव्यास मिळत आहेत.
गावच्या भल्यासाठी व जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी चांगली संकल्पना जोपासुन कृतीत आणले तर जनता खुपच नाराज होवू लागली आहे.
जनतेची मने दुखावली,हुकमी मते फुटली? "इकड आड तिकडं विहीर" अशी द्वीदामनस्थिती निर्माण झाली आहे.
जनते कडून येणाऱ्या विविध प्रतिक्रिया कोरोना ग्राम समितींना फार मोठ कोढ पडलय आता.

