shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोल्हापूर जिल्ह्याचा कडक लॉकडाऊन रविवार अखेर असणार - ना. हसन मुश्रीफ यांची माहिती ; सोमवारपासून मात्र राज्य शासनाच्या लॉकडाऊन प्रमाणे कार्यवाही होणार..!

प्रतिनिधि । अनिल पोवार :
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेला कडक  लॉकडाऊन हा रविवार अखेर असेल तर सोमवारपासून  राज्य सरकारने जाहीर केलेल्या     लॉकडाऊन  प्रमाणे कार्यवाही होईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कागल कोविड सेंटर येथे कोराेना आढावा बैठकीत  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

कोल्हापूर जिल्ह्यातील  लॉकडाऊन आणखीन काही दिवस वाढवला जाणार काय ? याविषयी अनेक मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. पण त्याला ना. हसन मुश्रीफ यांच्या माहितीमुळे आता पूर्णविराम मिळाला आहे. 

कागल येथे आयोजित करून आढावा  बैठकीस ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पंचायत समिती सभापती सौ. पुनम महाडिक- मगदूम, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर,  नगरसेवक प्रवीण काळबर, राजेंद्र सुतार, जयदीप पवार, राहुल महाडिक आदी प्रमुखांसह प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनीषा देसाई, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे व डॉ. उलका चरापले,  कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी तारळकर आदी प्रमुख उपस्थित होते.

          


   
close