जिल्ह्याधिकारी व आयुक्त यांनी दिले कड़क कारवाईचे आदेश...!
प्रतिनिधी । संजय वायकर :
अ .नगर (दि.२६) : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले आणि आयुक्त शंकर गोरे यांनी कड़क कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
नगर शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून लॉकडाऊन चे नियम पाळले जात नव्हते. विनाकारण फिरणारे लोक , तसेच परवानगी नसतानाही रोडवर होणारी भाजी विक्री आणि भाजी घेण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी हे पहाता करोना आजारपासून नगरकरांची लवकर सुटका होईल असे वाटत नव्हते.
परिणामी ही परिस्थिती पहाता
नगर मध्ये कड़क कारवाईचे आदेश देण्यात आले. पाईपलाईन रोड ,तपोवन रोड याठिकाणी ही मोठ्या प्रमाणात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली .त्यांना दंड आकारण्यात आला.
ए .पी .आय .प्रकाश पाटील तसेच पी . एस . आय . धाकराव हे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन कर ताना दिसून आले . तर विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ही केली जात होती .
पो. हे .कॉ .घुमरे, पो. हे .कॉ . पिंपळे, पो.हे .कॉ .बेरड, पो. कॉ . कोकाटे, पो . कॉ .पडवळ , पो.कॉ .भोसले हे आपली कामगिरी चोख बजावताना दिसून आले .

