प्रतिनिधी । आसावरी वायकर :
आठवड : ( दि .२९ ) :' गाव तिथे लसीकरण 'मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील आठवड येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन तसेच RT-PCR टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी टाकळी काझीचे सरपंच शहाजी आटोळे,MO डॉ.प्रियंका शेंदुरकर,CHO डॉ.सांगळे मॅडम,देठे सिस्टर,फुंदे सिस्टर,MPW लिपणे हे उपस्थित होते.
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच राजेन्द्र मोरे,मा.सरपंच सुनिल लगड,उपसरपंच बाबासाहेब मोरे,मा. उपसरपंच भाऊसाहेब लगड,शिवसेना उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड,ग्रा.प.सदस्य अशोकदादा चोभे,अतुल लगड सर,उद्योजक महादेव दाताळ,महादेव मोरे,जालिंदर लगड,वैभव मोरे,ग्रामसेवक कोतकर भाऊसाहेब,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

