shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओझं !


एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती ! दुपारचे बारा वाजले होते  ! रणरणत्या उन्हाने बेजार केले होते  !

एक साधू या मार्गावरून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता  ! त्याच्या जवळ दोन शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढंच सामान होतं ! पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं सामान ओझं वाटत होतं आणि घामाच्या धारा त्याच्या अंगावरून वाहत होत्या  !

थोडं पुढं गेल्यावर त्याला एक सत्तर वर्षाची आदिवासी महिला आठ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला वैद्यकीय उपचारासाठी पाठीवर घेऊन येत होती असे दिसले !  तो मुलगा धष्टपुष्ट होता  ! ती वृद्धा मोठ्या उत्साहानं तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती  !

साधूने त्या महिलेला विचारलं, ‘आजी, इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही हा उतरणीचा रस्ता कसा उतरता ?  मी तर एवढ्याशा ओझ्यानं हैराण झालो आहे  ! "
त्या वृद्धेनं साधूला नीट निरखून पाहिलं आणि म्हणाली, ‘महाराज, ओझं आपण वाहात आहात, हा तर माझा नातू आहे !’

तात्पर्य : खर्‍या प्रेमाने केलेल्या गोष्टीचे ओझे वाटत  नाही  !


___________////________////__________////_______

close