shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठी चित्रपटाची अभिनेत्री सुलक्षणा पाटील यांना दुसऱ्या महाराज अग्रसेन आंतरराष्ट्रीय चित्रपकेट महोत्सव 2021 मध्ये लाइफ टाइम अचिव्हमेंट गोल्डन अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिनिध : स्नेहा उत्तम मडावी 

भारतीय चित्रपट आणि टीव्ही  आर्टिस्ट असोसिएशन, अग्रसेन फिल्म एसोशिएशन आणि शंकर फिल्म्स यांच्या बॅनरखाली ऑनलाईन होणाऱ्या दुसऱ्या महाराज अग्रसेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट अभिनेत्री सुलक्षणा पाटील यांना महाराज अग्रसेन आंतरराष्ट्रीय लाइफ टाइम अचिव्हमेंट गोल्डन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  


महाराज अग्रसेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक गिरजा शंकर अग्रवाल यांनी सांगितले की सुलक्षणा मराठी चित्रपटांची एक नामांकित चित्रपट अभिनेत्री आहे.  सुलक्षणा कोल्हापूरची रहिवासी आहे.  

लहानपणापासूनच तिला अभिनय आणि नृत्य करण्याची आवड होती.  बॉलिवूड अभिनेत्री व्हावे वाटत होते. सुलक्षणा यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे हिंदी विषयात एमए (हिंदी) शिक्षण पूर्ण केले आहे,आणि अनेक यू ट्यूब न्यूज चॅनेलवर रिपोर्टर आणि अँकर म्हणूनही काम केले आहे.सुलक्षणा पाटील एक उत्तम मॉडेल आणि अभिनेत्री आहे. त्याच बरोबर ती एक चांगली आणि भावनिक व्यक्ती देखील आहे. 

सुलक्षणा यांना सामाजिक कार्यातही रस आहे. कोरोना काळात रूग्णांना तणावातून मुक्त करण्यासाठी रूग्णालयात डान्स व एक्टिंग शो केले आहेत.आणि हॉस्पिटल मधे सिस्टर चेही काम केले आहे. खुप गरीब अश्या मुलांना त्यांनी संगणकाचे ज्ञानही दिले आहे. गरजू लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.सुलक्षणा यांनी तुझ्यात जीव रंगला, जीव झाला येडापीसा आणि प्रेमाचा गेम सेम ते सेम मधे ही छोटेसे का असेनात अशा अनेक मराठी मालिकांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या आहेत. 

मराठी  चित्रपट  GR. मध्ये प्रसिद्ध  हिंदी, मराठी व दाक्षिणात्य अभिनेता सयाजी शिंदे यांच्या शिक्षिक़ेची भूमिका साकारली आहे.लग्नाकल्लोळ या फ़िल्म मधे सुपरस्टार सिद्धार्थ जाधव यांच्या बरोबर ही छोटा रोल मधे त्या दिसल्या आहेत. त्यांचे सुपरस्टार अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या समांतर वेबसीरिजमुळे त्यांचे जग बदलले. त्यातील काम थोडेसे होते, परंतु जे लोक त्यांना ओळखत नव्हते ते सुलक्षणा यांना ओळखायला लागले.  सुलक्षणा यांनी मोक्षान्त वेबसिरिज मधेहि मोठा रोल केला आहे.सुलक्षणा यांनी बर्‍याच जाहिराती शूट केल्या आहेत.  याव्यतिरिक्त त्यांनी अनेक लघुपटही केले आहेत.सुलक्षणा कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत अनेक नृत्य स्पर्धांच्या जज राहिल्या आहेत. त्यांनी  केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत.त्या चित्रपटाचे नाव Keep Silence आहे. ती फ़िल्म काही दिवसांत OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.  

हिंदी फिल्म 'भूमिजा''प्यारे पिताजी' आणि 'राधा किशन' या चित्रपटात त्या दिसणार आहेत. त्या  हबाडा, ​​फटकार आणि लडतर या मराठी चित्रपटांमध्येही काम करत आहेत. कोरोनाची परिस्थिती सुधारताच त्या नव्या जोमाने काम करण्यास तयार आहेत. लहानपणापासूनच त्यांना एक्टिंग मधे रस होता. 

आणि सुलक्षणा शाळा, महाविद्यालयाच्या बर्‍याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या.सुलक्षणा या नेहमीच प्रथम क्रमांक आणत असत.पण हे सर्व करूनही त्या जीवन अगदी साधेपनाने जगने त्यांना आवडते.

सर्वसामान्यांप्रमाणे मिसळुन मुक्तपणे जगणे हसमुख रहाने त्यांना आवडते. सुलक्षणा यांचा श्री साईबाबा यांच्यावर खुप विश्वास व श्रद्धा आहे आणि ती नेहमीच तिच्या आई व वडिलांच्या आशीर्वादानेच पुढे जाते.
close