shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर्थिक सदन नसतानाही इच्छा शक्ती जोरावर स्वखर्चाने तसेच काही दान्सूर मान्यवारांचं सहकार्याने भटक्या विमुक्त गोपाळ समाज बहुउदशीय सामाजिक संवस्था व संघटण्याच्या वतीने आन्याधन्या किराणा साहित्य किट वाटप घरी जाऊन अंध अपंग निराधार वयोवृद्धा कोणाचे रुग्णाचे कुटूंबाना देण्यात आले.

प्रतिनिधी सातारा 
आर्थिक सदन नसतांनाही ईच्छा शक्तीच्या जोरावर स्वखर्चाने तसेच काही दानशूर मान्यवरांच्या सहकार्याने भटक्या विमुक्त गोपाळ समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था व संघटनेच्या  वतीने कराड तालुक्यातील विविध गावामध्ये अपंग ,निराधार ,वयोवृद्ध व्यक्ती, कोरोना रुग्णाचे कुटुंबाना तसेच अनेक गरजवंतापर्यंत त्यांच्या निवासस्थानी जाऊन धान्य ,किराणा माल साहित्य किट वाटप या गरजवंतापर्यंत देण्यात आले.


कोविड १९ आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधानुसार लोकडावून परिस्थितीत अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाह कसा करायचा. असा प्रश्न निर्माण होऊन सर्व सामान्य जनतेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातच बेरोजगारी ,अपंग ,निराधार ,वयोवृद्ध, नागरिकांना तर उदरनिर्वाह करण्याविषयी खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अशाच वेळी भटक्या विमुक्त गोपाळ समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था व संघटनेच्या वतीने अशा गरजूच्या शोध घेऊन त्यांच्या घरी जाऊन धान्य व किराणा माल साहित्य वाटप करण्यात आले. 

यावेळी कराड तालुक्यातील कार्वे गोपाळनगर,संजयनगर  (शेणोली स्टेशन) गोपाळवस्ती,किल्लेमचिंद्रगड, कालवडे, नांदलापुर,कोयनावसाहत मलकापूर, चव्हाणवाडी जखिंणवाडी, पाटोळे, शिंदेंवाडी,चचेगाव ,इराणी समाज रिवेणू कॉलनी कराड,वारुंजी फाटा,पेरले, कोणेगावं, वडोली निलेश्वर,मुस्लिम समाज गोपाळनगर कार्वे, व तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गावामध्ये सुद्धा  प्रत्येकी  कमीत कमी ५००ते ६००किट वाटप या भटक्या विमुक्त बहुउद्देशीय गोपाळ समाज सामाजिक संस्था तसेच संघटनेच्या  वतीने किट वाटप करण्यात आले. 

यावेळी संस्था तसेच संघटनेचे (संस्थापक ) अध्यक्ष सुदामराव जाधव ,(राज्य-उपाध्यक्ष) चंद्रकांत चव्हाण , (राज्य-सचिव )शंकर चव्हाण, रवी जाधव ,(पोलीस पाटील), वैभव थोरात माजी सरपंच कार्वे, संताजी थोरात( सावकार ) सुरेश जाधव , विश्वास पवार ,मानसिंग चव्हाण ,विक्रम पवार ,नितीन पवार युवराज पवार, रुपाली डांगे पाटील मॅडम ,प्रतीक्षा चव्हाण(ग्रा.पं. सद्यस) चंद्रकांत डांगे पाटील ,मानसिंग लांवड  लांदलापूर(सरपंच) विलास शिर्के माजी उपसरपंच ,राजेंद्र सावंत कार्वे (पंच ) ,सागर देसाई ग्रा.पं( सद्यस),दिनकर जाधव (कार्वे पाटील)व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close