shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऐकावे ते नवलच...एकाच झाडाला 22 प्रकारचे आंबे..!!

सांगलीच्या काकासाहेबांनी केला अनोखा आणि यशस्वी प्रयोग..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर
सांगली (दि.१२) : एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतल्याचा प्रयोग सांगली मध्ये यशस्वी झाला आहे. 

सांगली येथील जत तालुक्यातील अंतराळ गावातील शेतकरी श्री .काकासाहेब सावंत यांनी हा प्रयोग केला आहे. आणि तो यशस्वी झाला आहे . विशेष म्हणजे त्यांना यात चांगलाच आर्थिक फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले .

केशर जातीचा आंबा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकला जातो. त्यामुळे काकासाहेब दरवर्षी आपल्या नर्सरीत केशर आंब्याची रोपे लावतात. प्रत्येक रोप 40 ते 70 रुपयांना विकले जाते. काकासाहेब दरवर्षी अंदाजे 2 लाख आंब्याची रोपे विकतात. त्यातूनच त्यांना चांगले उत्पन्न मिळते . चालू वर्षी त्यांना 4 लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. 

मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वत:च व्यवसाय सुरू केला. त्यातून मोठे यश कमावता येते, यामुळे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.
close