प्रतिनिधी। मोहन शेगर :
-लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना येथे शेतकऱ्यांना उसासाठी 2800 रु भाव मिळावा या मागणी बाबत गुरुवारी होणाऱ्या उपोषणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी संचालक मंडळा समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु या बैठकीत भाव वाढीबाबत संचालक मंडळाने उदासीनता दर्शवल्याने कुठलाही निर्णय न झाल्याने गुरुवारी1 जुलै सकाळी 10 वा कारखाना गेट सामोर मा आ बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण होणार आहे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या उपोषणाला सहभागी व्हावे असे आव्हान भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सचिव अंकुश काळे, अरुण गरड, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय काळे, अण्णासाहेब गव्हाणे, जनार्दन जाधव , दिघी सोसायटी चे चेअरमन दादा निकम शरद थोटे ह भ प कल्याण महाराज पवार, दत्तात्रय वाकचौरे, आदी उपस्थित होते

