shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्योजक रामभाऊ पवार यांनी अंध दांपत्य व गोरगरिबांना मदत करून केला वाढदिवस साजरा..!!

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप:
परंडा: दि.२९/ उद्योजक रामभाऊ पवार यांनी वाढदिवसावर वायफट खर्च टाळुन वाटेफळ येथील अंध दांपत्यांना जिवनावश्यक किराणा किट देऊन त्यांच्याच झोपडीत केला वाढदिवस साजरा.

   
परंडा तालुक्यातील वाटेफळ येथील श्रावण जालींदर लांडगे व त्याच्या पत्नी शांताबाई श्रावण लांडगे हे दोघेही अंध आहेत त्यांना धनश्री व राजश्री अशा दोन छोट्या मुली आहेत.श्रावण दोन्ही डोळ्यांनी अंध असुन सुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शालेय उपयोगी साहीत्याची विक्री करतात. लॉकडाऊन काळात श्रावण कुटुंबाला घर चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 
   
श्रावण याची हि अडचन गोरख मोरजकर यांनी उद्योजक रामभाऊ पवार यांच्या समोर मांडली असता श्री पवार यांनी लगेच लांडगे कुटुंबास मदत करण्यास धाव घेतली. श्री पवार यांनी लांडगे कुटुंबास तीन महिने पुरेल एवढे जिवनावश्यक किराणा भरून दिला व पूढील काळात येणार्या अडचणीत मदत करू अशी ग्वाही दिली. श्री पवार यांच्या मदतीने लॉकडाऊन काळात अडचणींवर मार्ग निघाल्याने लांडगे कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
  
श्री पवार यांचा परंडा येथेही अनुपसिंह सद्दीवाल कॉम्प्लेक्स येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. तिथेही श्री पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब लोकांना सेनीटायझर व मास्क चे वाटप केले.
   
वाढदिवस प्रसंगी पोलीस रीपोर्टरचे औरंगाबाद विभाग प्रमुख मा.बाबर मशायक यांच्या हस्ते श्री पवार यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
  
या कार्यक्रमास अमन मशायक,गुरुदास कांबळे, किरण डाके, रमेश परदेशी,पै.नाना पवार, एवरेस्ट देशमुख, समीर मुजावर, यांच्या सह परंडा तालुक्यातील श्री पवार यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या वेळी श्री पवार यांचा परंडा येथे विविध संस्था, व्यापारी यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार घालून सत्कार करण्यात आला.
   
श्री पवार हे लोकांचे त्यांच्या प्रती प्रेम पाहून भारावून गेले. आपण सदैव गोरगरिबांच्या मदतीसाठी कधीही हजर असणार असे आश्वासन यांनी सर्वांना दिले व सर्वांचे प्रेमपूर्वक आभार मानले.
close