संगमनेर (शौकतभाई शेख)-
अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संस्था शाखा संगमनेर तालुका यांच्यावतीने संगमनेर शहरात जनजागृती अभियानांतर्गत स्थानिक जागरूक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते व आदरणीय व्यक्तींची बैठक आयोजित करण्यात आली होती,
या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेते तथा अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शब्बीर अहमद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, यावेळी महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्री मराठाखान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. अन्सारी यांनी मुस्लिम ओ.बी.सी.चळवळ उभी करुन तळागळातील उपेक्षित मुस्लिम घटकांना मुख्य प्रवाहात जोडण्याचे मोठे कार्य केलेले आहे, देशभरातील विविध ठिकाणी मुस्लिम/ ओ.बी.सी सामाजोन्नतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहे, आपला सुमारे ४३ वर्षांचा संघर्षशील अनुभवही त्यांनी यावेळी कथन केला, या अभियानाशी संबंधित समाजाला होणारे फायदे सांगतानाच तसेच मुस्लिम समाजाने वक्फची संपत्ती पुन्हा मिळविण्यासाठी नव्या पिढीला संघर्षासाठी पुढे येण्याची नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले, तथा नवीन पिढीला पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले,
यावेळी बोलताना श्री मराठा खान म्हणाले की, मुस्लिम समाजाने शब्बीर अन्सारीं यांच्यासारख्या जुझारू, निडर,क्रांतिकारी नेत्यांना आपला नायक (हीरो) आणि आदर्श बनवायला पाहिजे, जेणेकरून पुढची पिढी स्वत: ला सामाजिक अनाथ म्हणून न मानता स्वत: ला सक्षम नेतृत्वाचा वारसा म्हणून अभिमान व्यक्त करेल,तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, चळवळीच्या गर्भापासूनच नेते जन्माला येतात आणि इतिहास निर्माण होतो, त्याचबरोबरच नवीन पिढीनी स्मार्ट आणि इंटेलिजेंट समाज घड़वावे तरुणांनी सामाजोन्नतीसाठी चळवळीत योगदान द्यावे असेही ते म्हणाले,
ही महत्त्वाची बैठक संगमनेर तालुकाध्यक्ष श्री शफी तांबोळी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी शब्बीर अन्सारी आणि मराठाखान यांचा शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सय्यद लियाकत रंगरेज, लाला बेपारी,नदीम कुरेशी, आसिफ बेपारी, बादशाह कुरेशी, अन्सार शिकलगार, अकील तांबोळी(@गुल्लू भाई), मोहसीन तांबोळी, अली तांबोळी, इमरान तांबोळी, अय्युब मणियार, जुबैर अत्तार, गफ्फर तांबोळी,आदी मान्यवर उपस्थित होते.

