shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"श्रीरामपूरात धो धो बरसला पाऊस"...! पुलाखालील पाण्यातून मोठ्या शिताफीने वाहन काढले बाहेर..!!


संकटसमयी मदत करणाऱ्या या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे

श्रीरामपूर । प्रतिनिधी:- येथील सय्यदबाबा दर्गाहजवळील रेल्वे अंडरग्राऊंड पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने वाहन नादुरुस्त होऊन पाण्यावर चक्क तरंगत अतानाचे दृष्य श्रीरामपूरांकराना बघावयास मिळाले,छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने सय्यदबाबा चौकाकडे येणाऱ्या एका चारचाकी वाहन चालकाने पुलाखाली आपले वाहन नेले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहन मध्येच बंद पडले तथा वाहन अक्षरशःपाण्यावर इकडे- तीकडे तरंगु लागले वाहन चालकाची अशी हतबलता पाहुन सय्यदबाबा दर्गाह आणि जामा मस्जिदीजवळील उभ्या असलेल्या तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यातील वाहनाकडे धाव घेतलीी, आणि त्या वाहनास धक्का मारत पाण्यातुन बाहेर काढले.

तेव्हा कुठे वाहन चालकासह वाहनात बसलेल्या सहप्रवाशांच्या जिवात जिव आले,अशाप्रकारे संकट समयी मदत करणाऱ्या व वेळेचे भान ठेवून कार्यतत्परता दाखविणार्या तरुणांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे,
close