shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खराटे मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण..!!

भिमराव खराटे याचा त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा आरोप..!! 
----------------------------------------

प्रकाश मुंडे  । बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीत विहिरीत सापडलेल्या मृतदेह प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मयताच्या भावाने हा आकस्मिक मृत्यू नसून मयत भिमराव यांची पहिली पत्नी व तिच्या प्रियकराने खून केला असल्याचा खळबळजनक आरोप त्याच्या भावाने करीत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २९ मे रोजी कळंब एसटी आगारातील चालक भिमराव खराटे (मूळ गाव भोगजी ता. कळंब) याचे प्रेत युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मांगवडगाव शिवारातील धनराज थोरात यांच्या विहित आढळून आले होते. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस स्टेशनला सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे हे करीत आहेत.

मयताच्या मुलगा सिद्धेश्वर खराटे याने दि.५ जून रोजी आम्हीच आईच्या मदतीने भिमरावचा खून करून प्रेत विहिरीत टाकले असल्याची माहिती फोनवरून दिली असून त्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील उपलब्ध आहेअसा उल्लेख निवेदनात केला आहे.
-----------------------------------------------

नवरा बायकोचे दोघांचेही अनैतिक संबंध :- मयत भिमराव खराटे याचे आंधळे वाडी येथील महिलेशी तर मयताच्या पत्नीचे भोगजी या गावातील  पुरुषा सोबत होते. या अनैतिक संबंधातून भिमराव खराटे चा खून करण्यात आल्याचा संशय आहे.

दरम्यान दि. १० जून रोजी मयताचा भाऊ बालाजी रंगनाथ खराटे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की, मयत भिमराव खराटे याच्या पत्नीचे गावातील एकाशी अनैतिक संबंध होते. तसेच ते दोघे पती-पत्नी हे मागील दहा वर्षां पासून विभक्त राहत होते. तसेच मयत भिमराव खराटे हा ४/५ वर्षां पासून आंधळेवाडी ता. केज एका दुसऱ्या महिले सोबत अनैतिक संबंध होते. ते पती-पत्नी सारखे दोघे एकत्र राहत होते. भिमराव हा स्वेच्छा निवृत्ती घेणार होता. त्या नंतर त्याला सेवा निवृत्ती नंतर मिळणाऱ्या लाभ व रक्कम ही तो त्याची रखेली हिला देणार असल्याची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली होती. म्हणून त्याची पहिली पत्नी व तिचा प्रियकर याने दि. २५ मे रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान भिमराव हा त्याची ड्युटी संपवून घरी जात असताना त्याला मोटार सायकलवर बसवून घेऊन गेले. त्या दोघानी भिमराव याला निर्जन स्थळी मारहाण करून त्याला मारून त्याचे प्रेत मांगवडगाव शिवारातील धनराज थोरात याच्या विहिरीत टाकले असल्याचा खळबळजनक आरोप मयत भीमरावचा भाऊ बालाजी खराडे यांनी केली आहे.


या प्रकरणी मयताची पत्नी तिचा प्रियकर व मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत भिमराव खराटे याचा भाऊ बालाजी खराटे यांनी केली आहे.

--------------------------------------------------



close