shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाटुंबा पाटीवर मोटरसायकल टेम्पोच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 

केज-अंबाजोगाई रोड वर चंदन सावरगाव जवळी पाठवा पाटीजवळ मोटारसायकलला टेम्पोने मागील बाजूने धडक दिली यात मोटरसायकलवर मागे बसलेल्या शिक्षिका सौ अश्विनी अशोक धपाटे वय ५१ वर्षे या जागीच ठार झाल्या.

या बाबतची माहिती अशी की, दि. ११ जून, शुक्रवार रोजी सायंकाळी ६: ०० वा. च्या सुमारास अशोक धपाटे व त्यांची पत्नी अश्विनी धपाटे या मोटारसायकल क्रमांक (एमएच-२३/जे/९९१६) भाटुंबा येथून केजकडे येत होते. ते भाटुंबा गावातून येणाऱ्या अप्रोच रोडवरून केज-अंबाजोगाई या मुख्य रोडला येत असताना त्यांच्या मागील बाजूने येणाऱ्या टेम्पो क्रमांक (एमएच-१७/एजी-१४५९) या टेंपोने त्यांना मागून जोराची धडक दिली. या अपघातात मोटरसायकल सुमारे पन्नास फूट फरफटत गेली. 

या धडकेत कुंबेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. अश्विनी अशोक धपाटे वय ५१ वर्षे या जागीच ठार झाल्या असून त्यांचे पती अशोक धपाटे हे गंभीर जखमी झाले आहेत.
close