shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.वि.प शिर्डीच्या वतीने विविध योगासने करून अतिशय उत्साही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!!

शिर्डी | दि.२१ प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिर्डी शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस आज सकाळी ७ वाजता हॉटेल जे के पॅलेस शिर्डी येथे साजरा करण्यात आला. स्वस्थ जिवन जगण हे जिवनाचे भांडवल आहे तर रोज योग करण ही रोगमुक्त जिवनाची गुरुकिल्ली असून सर्वांनी योगा करून स्वतःला निरोगी ठेवावे असा संदेश यानिमित्त देण्यात आला. 









यावेळी योगगुरू संजय चोळके यांनी उपस्थितांना योगाचे फायदे, व वेगवेगळी आसणे, प्राणायाम या संदर्भात मार्गदर्शन केले. भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. योग दिनच्या निमित्ताने योग करायला सुरूवात करा आणि कोरोना व्हायरसपासून स्वतःला लांब ठेवा. योग हाच स्वस्थ आरोग्याचा पासवर्ड आहे. शारीरिक, मानसिक उत्तम आरोग्यासाठी आध्यात्मिक साधनेतून शरीर व मनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी योग फार महत्वाचं काम करते. भारतीय परंपरेत योग साधनेला पुरातन काळापासून महत्व देण्यात आले आहे. 

जगभर योग साधनेच्या माध्यमातून शांतता आणि मानसिक समाधानाचे प्रसन्न विचार आणि भारतीय संस्कृती यामुळे रुजणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त मोठ्या संख्येने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

close