shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेहनुमा चाॅरिटेबल सोशल वेलफेअर संस्था व मुस्लीम समाजा च्या वतीने स्व हस्तलिखित पत्राद्वारे आरक्षणाचे निवेदन देण्यात आले..!!

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप.

करमाळा: दि: २१/महाराष्ट्र राज्य सरकारने 5%  आरक्षण हे मुस्लीम समाज्याला शिक्षण व नोकरी साठी लागू करावे,,जिल्हा व तालुकास्तरीय अल्पसंख्याक समाज बांधवांच्या मुला-मुलींसाठी आर्थिक निवासी वस्तीग्रह झाले पाहिजे,,मौलाना आझाद विकास महामंडळ द्वारे उद्योग व्यवसाय व शैक्षणिक कर्ज मिळाले पाहिजे



महाराष्ट्र राज्य आणि वफ्फ महामंडळाचा कारभार पारदर्शक झाला पाहिजे यासाठी सक्षम अधिकारी कायम स्वरूपी असावा,,ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी दफन-भूमीसाठी सरकारी जागा मिळावी या आशायाचे स्व-हस्त अक्षराने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना साध्या कार्डद्वारे निवेदन द्यावे असे आवाहन रेहनुमा चाॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष-:हाजी कलीम काझी(सर)यांनी केले 

करमाळा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांची आरक्षण व इतर प्रलंबित विषयावर चर्चा करणे कामी मिटिंग आयोजित करण्यात आली त्या प्रसंगी काझी बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख होते 

याप्रसंगी बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष-ईसाक पठान,, रेहनुमा चाॅरीटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष-:ईमत्याज पठाण,,सचिव-:सुरज शेख ,,सह-सचिव व राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते मुस्‍तकीम पठाण,, आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष-:युसूफ शेख सर राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा बामसेफ तालुकाअध्यक्ष कय्युम शेख,,केम चे सरदार भाई पठान,टिपू सुलतान ग्रुप चे अध्यक्ष-: सुफरान शेख,,अल-सहारा सोशल ग्रुपचे युवा अध्यक्ष-:तौफीक शेख,,आमिन बेग,, ह्युमन राईट चे अध्यक्ष-:आयुब शेख,,गुळसुडी चे उपसरपंच-:आदम शेख,,महात्मा गांधी तंटामुक्ती पांडे अध्यक्ष-: युनूस मुजावर,,उत्तर वडगाव माजी सरपंच सदरोद्दिन पठाण,,पैलवान आदम शेख,,राजू सय्यद,,राजू नालबंद,,जमीर बागवान,,समिर सय्यद(बब्बु),, सलीम पिंजारी,,बिलाल मदारी,,सलीम मदारी इत्यादी उपस्थित होते शेवटी आभार बबलू पठाण यांनी मानले व सूत्रसंचालन ॲड अलिम पठाण यांनी केले.

close