प्रतिनिधी :आसावरी वायकर
रांजणी : (दि .१९ ) :लोकनेते मारूतरावजी घुले पाटील उद्योग समूहाचे विद्यामान अध्यक्ष,कुशल मार्गदर्शक,डाॅ . मा .आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणी हनुमान मंदिर परिसरात ह.भ.प. अशोक महाराज बोरुडे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे . प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावायला हवे . असे अशोक महाराज बोरुडे यांनी यावेळी सांगितले .
यावेळी काकासाहेब घुले सर,अरूण मामा,अशोक थोटे,शिवनाथ बाबा,अंकुश पवार व सर्व गावकरी उपस्थित होते .

