प्रतिनिधी :संजय वायकर
अ .नगर :(दि .१९ ) :देशात कोरोनाचा कहर सुरु असून आता तर कुठे देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.
मात्र धोका अद्याप टळेलला नाही .देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार, भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.
या सर्वेक्षणानुसार, नागरिकांना किमान एक वर्ष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
या सर्वेक्षणात जगभरातील ४० आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, साथीच्या रोगाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचा समावेश होता.
त्यांच्याकडून ३ ते १७ जून दरम्यान कोरोना व्हायरस संदर्भात अभिप्राय घेण्यात आला.
या सर्वेक्षणानुसार, ८५ टक्क्यांहून अधिक म्हणजे २४ पैकी २१ जणांनी असे सांगितले की, ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट देशात येणार आहे.
सध्या देशात असणारी कोरोनाची लाट अधिक प्राणघातक ठरली. त्यामुळे या काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे देखील समोर आले आहे .

